शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाही लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवेल- आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 16:42 IST

2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीनं या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई -  2019च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीनं या ठरावाला मंजुरी दिल्यानंतर भाजपानं शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपाही स्वबळावर लढवण्यात तयार असल्याचे सूतोवाच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलं आहे.ते म्हणाले, खरंतर आमची युती करण्याची भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असल्यास 2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकाही भाजपा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. परंतु शिवसेनेनं स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्यास त्यांचेच नुकसान होणार आहे, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचं नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ 5 तर भाजपाचे 28 खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.काकडे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आज निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे सेनेची वाढ होणार नसून नुकसानच होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास, मोठा भाऊ भाजपाच राहील. मोदींच्या करिष्म्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपाचे 28 आणि शिवसेनेचे 5 खासदार निवडून येतील. शिवाय विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपाचे 165 आमदार निवडून येतील, असं भाकितही काकडेंनी वर्तवलं आहे. 

2019च्या दोन्ही निवडणुका स्वबळावर लढू- उद्धव ठाकरेशिवसेना 2019 च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडलेल्या ठरावाला कार्यकारिणीत मंजुरी मिळाली आहे. वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर हा ठराव मांडण्यात आला. यावेळी एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. 

दरम्यान ठराव मांडले जाण्याआधी पार पडलेल्या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाElectionनिवडणूक