भाजपा राज्य कार्यकारिणीत होणार निवडणुकांवर मंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:51 IST2019-01-28T04:50:48+5:302019-01-28T04:51:10+5:30

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी जालन्यात होत असून त्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर मंथन होणार आहे. 

BJP will be in the state executive | भाजपा राज्य कार्यकारिणीत होणार निवडणुकांवर मंथन

भाजपा राज्य कार्यकारिणीत होणार निवडणुकांवर मंथन

जालना : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी जालन्यात होत असून त्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर मंथन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात होत असलेल्या या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंठा चौफुलीवरील शीतल सिडस्च्या मैदानवर मंडपाची उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्धा डझन मंत्री बैठकीला उपस्थित राहतील.

बैठकीच्या तयारीसाठी गेल्या आठवडाभरापासून भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणीक हे जालन्यात तळ ठोकून आहेत. शहरातील प्रमुख हॉटेल्स, शासकीय विश्रामगृह आणि खासगी कंपन्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये मंत्री तसेच येणाऱ्या पदाधिकाºयांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. बैठकीनंतर सायंकाळी सहा वाजता फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

Web Title: BJP will be in the state executive