शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजपा भुईसपाट होईल

By admin | Updated: January 18, 2017 06:50 IST

भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला.

औरंगाबाद : भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला. भाजपाशी युती झाली नाही, तर भाजपा भुईसपाट होईल, असे वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले, तर दुसरीकडे खा. चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा खरा प्रतिस्पर्धी भाजपाच असल्याचे वक्तव्य केले. मंगळवारी येथे झालेल्या औरंगाबाद-जालना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक पातळीपर्यंतच्या भाजपा यंत्रणेवर जोरदार टीका करत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी औरंगाबादेतील गुलमंडीतून (गुलमंडीत भाजपाचा पदाधिकारी राहातो.) भाजपाने दीड कोटी पाठविले, तर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नगरपालिकेसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा मलिदा वाटल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला. केलेले आरोप सिद्ध करून दाखवेन, पैठणमध्ये भाजपाचे लोक पैसे वाटताना पकडले गेले. जि.प. निवडणुकीतदेखील भाजपा पैठण पॅटर्न राबवेल. भाजपा शिवसेनेशी सुडाचे राजकारण करीत आहे. त्यामुळे युती कशाला करायची? लक्ष्मीदर्शनची भाषा करणारे खा. रावसाहेब दानवे कानात सांगतात, जा कामाला लागा, असे खैरे म्हणाले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तर भाजपाला सज्जड दम भरला. भाजपाने शिवसेनेसोबत युती केली नाही, तर ते भुईसपाट होतील, असा अहवालच माझ्याकडे आहे. त्यामुळे युती करायचीच नाही, असे माझे मत आहे. तुमचे मत काय आहे, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले, त्या वेळी सर्वांनी हात उंचावून ‘युती नको ’, ‘युती नको’ असा सूर लावला. भाजपा वाजवीपेक्षा जास्त जागा मागत आहे. त्यामुळे युतीबाबत विचार करावाच लागेल, असे खोतकर म्हणाले. (प्रतिनिधी)>नेत्यांनो, खिशात हात घाला!या वेळी परभणीचे खा. संजय जाधव हे व्यासपीठावरील खा. खैरे, राज्यमंत्री खोतकर यांच्याकडे पाहून म्हणाले, तुमच्या निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असेल, तर या निवडणुकींमध्ये १ ते २ कोटींचा खर्च नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाने पुण्यातील एका निवडणुकीत १० हजार रुपये एका मताला दिले. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी खिशात हात घातला पाहिजे. नेत्यांनी बहाणे करून निवडणुकीतून पळ काढू नये. त्यांनी सर्कल, गणाची जबाबदारी घेतली पाहिजे.तसेच उमेदवारी मिळेपर्यंत लाखोंचा खर्च करण्याची भाषण करणारे उमेदवारी मिळताच हातवर करून टाकतात, असेही ते म्हणाले.