शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मुंबईतील मनसेच्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविली : सुषमा अंधारेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:54 AM

नागरिकत्व कायद्याला सोलापुरात विरोध; संविधान बचाओ आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग

ठळक मुद्देसीएए, एनआरसी, एनपीआर या विरोधात संविधान बचाओ कृती समितीतर्फे महिला आंदोलनसुषमा अंधारे यांनी भाजप तसेच राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केलीराज ठाक रेंनी लोकांची माथी भडकविण्याचे काम करु नये : प्रा. सुषमा अंधारे

सोलापूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राजकारण आता संपलेले आहे. त्यांनी लोकांची माथी भडकविण्याचे काम करु नये, असे म्हणताना काही दिवसांपूर्वी त्यांनी काढलेल्या मोर्चाला भाजपने वाहने पुरविल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी सोलापुरात केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआर या विरोधात संविधान बचाओ कृती समितीतर्फे महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनात उपस्थित सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, तलवारीबद्दल राज ठाकरे तुम्ही बोलू नकात. तलवारीविषयी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बोलावे. महाराजांचे मावळे हे मुस्लीम, आलुतेदार, बलुतेदार असे सर्व समाजातील होते. जे खºया अर्थाने शिवरायांचे विचार पुढे नेतात. त्यांनाच बोलायचा अधिकार आहे.  निवडणुकांपूर्वी लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे आता काय झाले तुम्हाला ?. राज ठाकरे हे ‘बंद कर रे तो व्हिडीओ..उचल तो दगड’ असे फक्त चर्चेत राहण्यासाठी करतात.

वर्षाला दोन कोटी रोजगार देतो म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्यक्षात रोजगार दिलाच नाही. देशात अनेकजण बेरोजगार आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारु नये, यासाठी हा खटाटोप आहे. धार्मिक दंगल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मतदान कार्डामुळे तुम्ही निवडून आलात त्या मतदान कार्डाला अवैध ठरवत आहात. या विरोधात मुस्लीमच नाही तर इतर लोकही काम करत आहेत.

अल्पसंख्याकांनी भाजपपासून वेगळे व्हावे- न्यायालयाने चार आठवड्याचा वेळ दिला आहे.  हे तीन आठवडे संयमाची परीक्षा पाहणारे आहेत. सर्व स्त्रियांनी तीन आठवडे आंदोलन अजून चालवायचे आहे़ पुढच्या टप्प्यामध्ये मुख्य चौकात बोर्डावर स्वाक्षरी अभियान घेऊ. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी चौकात येऊन पाठिंबा द्यावा. ज्या भाजपने नागरिकत्व संशोधन कायदा बनविला. त्या पक्षासोबत अल्पसंख्याक लोक जे  खासदार, आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, तालुका पंचायतीत असतील त्यांनी भाजपतून बाहेर पडून आंदेलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रा. अंधारे यांनी केले.

टॅग्स :Solapurसोलापूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा