शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:56 IST

कोणताही शब्द, आश्वासन न घेता भाजपात जात आहे. प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचाच आग्रह आहे असं कुणाल पाटील यांनी सांगितले.

नाशिक - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने तयारीला सुरुवात केली आहे. त्यात नुकतेच उद्धवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील आणखी २ माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहे. येत्या १ आणि २ तारखेला हे पक्षप्रवेश पार पडणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपाची ताकद वाढणार आहे.

अलीकडेच धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपात जातील अशी चर्चा होती. आता मंगळवारी १ जुलैला कुणाल पाटील अधिकृतपणे भाजपात प्रवेश करणार आहेत. २०१४ ची विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मला पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा दावाही कुणाल पाटील यांनी केला आहे. कोणताही शब्द, आश्वासन न घेता भाजपात जात आहे. प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचाच आग्रह आहे असं कुणाल पाटील यांनी सांगितले.

कोण आहे कुणाल पाटील?

कुणाल पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. रोहिदास पाटील यांचे चिरंजीव असून मागील ३ पिढ्यांपासून त्यांचे कुटुंब काँग्रेसमध्ये सक्रीय राहिले आहे. मागील २ महिन्यापासून कुणाल पाटील काँग्रेस सोडून भाजपात दाखल होण्याच्या चर्चा होत्या. मात्र पाटील यांनी अगदी २ दिवसापर्यंत या चर्चांना नकार दिला होता. परंतु समर्थकांच्या मेळाव्यात देखील कुणाल पाटील यांनी भाजपा प्रवेशाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नव्हती. आता ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरे हेदेखील बुधवारी २ तारखेला मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात समर्थकांसह भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दूरध्वनी करून डॉ. हिरे यांना पक्षात अधिकृत प्रवेशासाठी आमंत्रित केल्याची माहिती हिरे यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा झाली असून त्यानंतर पक्षात अधिकृत प्रवेश करण्याचे ठरले असं हिरे यांनी म्हटलं. 

टॅग्स :BJPभाजपाKunal Patilकुणाल पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र