शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?

By admin | Updated: December 21, 2014 00:11 IST

महापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना यांच्यात जागावाटपावरून खडाखडी होणार असे संकेत आतापासून प्राप्त होऊ लागले आहेत. भाजपाला मुंबई, ठाणे महापालिकांसह सर्व महापालिकांत निम्म्या

संदीप प्रधान - नागपूरमहापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना यांच्यात जागावाटपावरून खडाखडी होणार असे संकेत आतापासून प्राप्त होऊ लागले आहेत. भाजपाला मुंबई, ठाणे महापालिकांसह सर्व महापालिकांत निम्म्या जागा भाजपाला सोडण्याचा आग्रह त्या पक्षाने शिवसेनेकडे धरलेला आहे. त्यामुळे अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.सर्वात प्रथम २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार असून त्यानंतर २०१६ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे ३३ तर भाजपाचे केवळ ९ सदस्य आहेत. १०७ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेतील ६२ जागा शिवसेनेने तर ४५ जागा भाजपाने लढवल्या होत्या. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ७५ तर भाजपाचे ३२ सदस्य आहेत. २२७ सदस्यसंख्या असलेल्या या महापालिकेतील १३५ जागा शिवसेना तर ६३ जागा भाजपा लढली होती. रिपाइंला शिवसेनेने २९ जागा सोडल्या होत्या. आता या दोन महापालिकेत जरी भाजपाने निम्म्या जागांची मागणी केली तरी भाजपा-शिवसेनेत संघर्ष सुरु होऊ शकतो. मुंबई महापालिकेत निम्म्या जागा भाजपाने मागितल्या तर त्यांना ४३ जागा वाढवून द्याव्या लागतील. सध्या शिवसेना व भाजपा लढवत असलेल्या जागांमधील अंतर ७२ जागांचे आहे.शिवसेनेचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना महापालिकांमध्ये निम्म्या जागा भाजपाला सोडण्याची हमी देण्याची अट घालण्याचा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र महापालिका जागांची चर्चा आता नको, असे सांगत शिवसेनेने त्याला विरोध केला होता. परंतु भाजपाने निम्म्या जागांचा मुद्दा सोडलेला नाही. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सर्व महापालिकांत युती अशक्य असल्याचे केलेले सूतोवाच हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. राज्यातील २६ महापालिकांमध्ये सध्या भाजपाचे ३१५ सदस्य आहेत. मुंबईकरिता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्याच्या मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला विरोध करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्पितळातून धाडण्यामागेही महापालिका निवडणुका कळीच्या ठरणार हे पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्याचे निदर्शक आहे. नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीकरिता कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. '