“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 07:34 IST2025-07-27T07:33:51+5:302025-07-27T07:34:33+5:30
उद्धवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत. लाडक्या पुरुषांनी घेतलेल्या लाभाची चौकशी सरकारने केली पाहिजे.

“लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष उद्धवसेनेचे, लुटायची सवय लागली”; कुणी केली टीका?
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणारे पुरुष हे उद्धवसेनेचे असतील असा टोला भाजप नेते राम कदम यांनी शनिवारी लगावला. लुटायची सवय त्यांना लागलेली असल्याचे सांगत, अडीच वर्षांच्या काळात खिचडी चोर, रेमडेसिवीर चोर हीच कामे त्यांनी केली आहेत, असेही ते म्हणाले.
ठाण्यात आनंद आश्रम येथे सायंकाळी भेट दिली, यावेळी ते माध्यामांशी बोलत होते. लाडक्या पुरुषांनी घेतलेल्या लाभाची चौकशी सरकारने केली पाहिजे. याच्यामध्ये उद्धवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत. मुंबईमध्ये खिचडीत यांनी पैसे खाल्ले, मात्र एकनाथ शिंदे यांनी परदेशातून रेमडेसिवीर आणून महाराष्ट्रात मोफत वाटल्याचा दाखलाही दिला.