शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:26 IST

भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार असं बोलले गेले. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करून फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे. हा आरोप शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आमच्या पक्षातील खासदारांना फोन करत आहेत. बाप-लेकीला सोडून आमच्याकडे या असं सांगितले जात आहे. आमचे खासदार फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे मात्र आमच्या खासदारांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. प्रत्येकजण त्यांच्यासारखे कमरेचा लंगोट डोक्यावर घालून फिरत नाही. आमच्याकडे आजही नैतिकता आहे असं त्यांनी म्हटलं.

नितीश कुमारांना घाबरवण्याचा प्रयत्न 

त्याशिवाय हे सगळे नितीश कुमार यांना एनडीएतच ठेवण्यासाठी केले जात आहे. शरद पवार येतायेत, उद्धव ठाकरे येतायेत अशा चर्चा केल्या जातात जेणेकरून नितीश कुमार एनडीएतच राहतील. आमच्या खासदारांना फोन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. तर जोपर्यंत शरद पवार गटाचे खासदार फोडणार नाही तोवर केंद्रात मंत्रिपद देणार नाहीअसं भाजपाने अट ठेवली आहे. प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद हवे. शरद पवार गटाचे ६-७ आमदार फोडले तर पटेल मंत्री बनतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

'ऑपरेशन २७२' प्लॅनिंग?

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन २७२ ची चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावर केंद्रात भाजपाचं २४० खासदारांच्या पाठिंब्याने अल्पमतात सरकार बनले आहे. चंद्राबाबू नायडू १६ आणि नितीश कुमार यांचे १२ खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणे सोडण्यासाठी भाजपाकडून ऑपरेशन २७२ चं प्लॅनिंग केले जात असल्याचं बोलले जाते. ज्यात शरद पवार गटाचे ८ आणि उद्धव ठाकरे गटाचे ९ खासदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले. सर्व खासदार सोबत येतील किंवा एक तृतीयांश खासदार फोडले जातील असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.  

टॅग्स :BJPभाजपाSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूNarendra Modiनरेंद्र मोदी