शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी भाजपाने मला ऑफर दिली होती, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 8:29 AM

Prakash Ambedkar News: द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी मला ऑफर दिली होती, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी मला ऑफर दिली होती, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र ही ऑफर भाजपाच्या कुठल्या नेत्याने दिली होती, याचा उलगडा मात्र प्रकाश आंबेडकर यांनी केलेला नाही. 

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा सनसनाटी दावा केला. ते म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यापूर्वी भाजपाने तुम्हाला राष्ट्रपती बनायला आवडेल का? अशी विचारणा माझ्याकडे केली होती. तेव्हा माझ्या राजकीय जीवनातील १० वर्षे शिल्लक असून, तुम्ही मला आताच राजकारणातून काढण्याचा प्रयत्न करत आहात का? असा सवाल मी त्यांना विचारला. जर २०२४ मध्ये राजकीय पक्षांनी व्यवस्थित काम केलं तर मी तुमच्या विरोधात आहे, याची कल्पना तुम्हला आहे. म्हणूनच तुम्ही मला सध्याच्या राजकीय चित्रामधून काढण्याचा प्रयत्न करत आहात, असे मी त्यांना सांगितले. 

यावेळी राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिली, अशी विचारणा केली असता त्याचं उत्तर देणं प्रकाश आंबेडकर यांनी टाळलं. मला देण्यात आलेल्या या ऑफरबाबत भाजपाच्या नेत्यांना विचारा, ते तुम्हाला माहिती देतील. मात्र मला ही ऑफर कुणी दिली होती, त्याचा सोर्स कधीही सांगणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ज्या रस्त्याने जायचं नाही, त्या रस्त्याचा आम्ही कधीही विचार केला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्याविरोधात कितीही भूमिका घेतली. तरी आम्ही भाजपासोबत कधीही हातमिळवणी केलेली नाही. आज संघ आणि भाजपाच्या विचारसरणीला जर कुणी आव्हान देऊ शकत असतील, तर ते फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आहेत. त्यामुळे मला राष्ट्रपतीपद, पंतप्रधानपद आणि राज्यपालपद यापैकी काहीही ऑफर दिली तरी मी अजिबात भाजपात जाणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपा