...तर राष्ट्रवादीला डबल लॉटरी; राज्यासह केंद्रातही मंत्रिपदांची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:30 AM2019-11-19T03:30:10+5:302019-11-19T06:37:23+5:30

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रशंसेने चर्चेला ऊत

BJP-Nationalist tide? Arguments on Pawar's Googly too | ...तर राष्ट्रवादीला डबल लॉटरी; राज्यासह केंद्रातही मंत्रिपदांची संधी

...तर राष्ट्रवादीला डबल लॉटरी; राज्यासह केंद्रातही मंत्रिपदांची संधी

googlenewsNext

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रशंसा केल्याने राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सत्तेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार आहे, असे त्या पक्षाचे नेते खासगीत सांगत आहेत. भाजपचे १०५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. त्यांचे संख्याबळ १५९ होते, शिवाय भाजपला लहान पक्ष व अपक्ष अशा १४ आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ १७३ होते. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे ५४ सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात २३४ सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला ११७ आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे ११९ आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीने राष्ट्रवादीने २0१४ साली भाजपला मदत दिली होती.

आता सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद व १५ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, शिवाय केंद्रात एकवा दोन मंत्रिपदे दिली जातील. भाजपला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडून भाजपसोबत जाईल, अशीही चर्चा आहे.

Web Title: BJP-Nationalist tide? Arguments on Pawar's Googly too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.