शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-मनसे युती संपुष्टात

By admin | Updated: September 10, 2014 03:03 IST

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेची साथ सोडून मनसेशी घरोबा करणा-या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका दिला आहे

नाशिक : अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेची साथ सोडून मनसेशी घरोबा करणाऱ्या भाजपाने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला झटका दिला आहे. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र महापालिका आघाडीचे अध्यक्ष विजय साने यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. भाजपाने चूक सुधारल्याबद्दल शिवसेनेने समाधान व्यक्त केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक ४० उमेदवार निवडून आले, परंतु बहुमत नसल्याने जनतेचा कौल मनसेच्या बाजूने असल्याचे सांगत भाजपाने सेनेशी युती तोडून मनसेला साथ दिली. मनसेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर असे समीकरण होते. मात्र काही महिन्यांपासून मनसे-भाजपात खटके उडू लागले. त्यातच स्थायी समिती सभापतिपदासाठी मनसेने शब्द पाळला नाही, हे निमित्त झाले. यंदा महापौरपद भाजपालाच हवे, असा हेका धरून स्थानिक भाजपा नेत्यांनी मुंबईत राज ठाकरेंशी चर्चाही केली होती. मात्र ऐववेळी भाजपाने वेगळा निर्णय घेतला. महापौरपदासाठी शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी तर भाजपाने उपमहापौरपदासाठी एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. मनसेसह अन्य पक्षांचा उमेदवारीबाबत थेट निर्णय न झाल्याने एकापेक्षा अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)