राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 11:54 IST2020-01-16T11:52:13+5:302020-01-16T11:54:20+5:30

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

BJP MLA Prasad Lad criticizes Sanjay Raut | राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड

राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड

मुंबई - शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजपा नेत्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाचा अपमान तर केलातच, आता शिवरायांच्या वंशजांचा सुद्धा अपमान करत आहात. मात्र शिवरायांच्या वंशजांचा अपमान कदापि सहन करणार नसल्याचं आमदार लाड म्हणाले आहे.

तर उदयनराजे भोसले यांना शिवरायांचे वशंज आहे का ? असे विचारणारे संजय राऊत हे हिंदू आहेत की मुघलांची औलाद ? अशा शब्दात आमदार लाड यांनी राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या विधानावर छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच वाद सुरू केला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा असेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.

 

 

 

Web Title: BJP MLA Prasad Lad criticizes Sanjay Raut