BJP Nitesh Rane News: राहुल गांधी हे जनतेशी नाळ नसलेले नेते आहेत. देशासाठी पर्यटक असलेले नेते आहेत. अधिक वेळ ते बाहेरच असतात. आताही बाहेरच आहेत. देशाची बदनामी करतात. थोडे दिवस देशात राहतात आणि पुन्हा परदेशात जातात. अर्धवेळ राजकारणी आहेत. यांना १०० टक्के भारतीय म्हणायचे का हा प्रश्न उपस्थित होतो, या शब्दांत भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी टीका केली.
बिहार निवडणूक निकालांवर नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींवर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले की, अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले. एका बाजूला व्होटचोरी म्हणून बोंब मारायची आणि दुसरीकडे लोकशाहीची थट्टा करायची, ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बिहारच नेतृत्व करण्याची संधी दिली आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे
मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले की, काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत तर आपण लाबून हसणे योग्य आहे. काँग्रेसवाले नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार वेगळे बोलतात, वर्षा गायकवाड वेगळे बोलतात, तर तिकडे अस्लम शेख वेगळे बोलणार. मात्र, हे सगळे मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. काँग्रेसची भाषा ही जिह्याद्यांची भाषा आहे. काँग्रेसवर मुंबईसह, राज्यात, देशात कुणाचाही विश्वास राहिला नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.
दरम्यान, देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सैनिक शाळा सुरू होत आहे. ही जिल्हासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या शाळेच्या माध्यमातून भविष्यात अनेक सैनिकांसह मोठे अधिकारी त्यातून तयार होतील. हा विश्वास आहे, असे राणे यांनी नमूद केले.
Web Summary : BJP's Nitesh Rane slams Rahul Gandhi as a part-time politician, disconnected from the people. He mocked potential Congress-MNS alliance talks, saying it's laughable. Rane also highlighted the upcoming Sainik school in Sindhudurg as a source of pride.
Web Summary : भाजपा के नितेश राणे ने राहुल गांधी को अंशकालिक नेता बताया और लोगों से कटा हुआ कहा। उन्होंने कांग्रेस-मनसे की संभावित गठबंधन वार्ता का मजाक उड़ाया। राणे ने सिंधुदुर्ग में आगामी सैनिक स्कूल को गर्व का स्रोत बताया।