शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

'...तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 3:34 PM

भीमा कोरेगाव प्रकरणावरुन भाजपाची शिवसेना, राष्ट्रवादीवर टीका

मुंबई: भीमा कोरेगाववरुन महाविकास आघाडीतले दोन पक्ष आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण तत्कालीन सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवलेलं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला. या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. मात्र या प्रकरणातले पुरावे पोलिसांनी खातरजमा करुनच दाखल केलेले असून ते न्यायालयानंदेखील मान्य केलेले आहेत, अशी भूमिका तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मांडली आहे. त्यामुळे भीमा कोरेगाववरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे. भीमा कोरेगाववरुन परस्परविरोधी विधानं करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला. शरद पवारांना राज्यातल्या पोलिसांवर संशय आहे का?, तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या कामावर त्यांना शंका आहे का?, केसरकर शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे या प्रकरणात शिवसेना दोषी आहे का?, असे प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले. यामध्ये शिवसेना दोषी असल्यास या प्रकरणाची चौकशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कशी करणार? त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं मुनगंटीवार म्हणाले. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा दंगलीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे २००वा विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाजविघातक घटकांकडून मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचं पर्यवसान दंगलीत झाले. मात्र पोलिसांनी दंगलीस आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवारवाडा परिसरात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यं कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला. तसंच दंगल घडवण्यात माओवादी संघटनेचा हात असल्याच्या संशयावरून अटकसत्र सुरू केलं. माओवाद्यांशी संबंध असल्याचं दाखवून, व्यवस्थेविरूद्ध संघर्ष करणाऱ्या बुद्धिजीवी, प्रतिष्ठित व निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. 

केसरकर काय म्हणाले?भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी तपास करुन न्यायालयासमोर पुरावे ठेवलेले आहेत. त्या पुराव्यांची खातरजमा करण्यात आलेली आहे. न्यायालयानंदेखील ते पुरावे मान्य केले आहेत. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर पुरावे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही. या प्रकरणात समितीचा अहवाल आल्यावरच खरं काय, खोटं काय ते समजेल.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार