गुलाल आमच्याच वाट्याला होता, मात्र तो दुसऱ्यांनी चोरून नेला; भाजप आमदाराचा शिवसेनेला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:03 IST2022-01-20T15:02:36+5:302022-01-20T15:03:08+5:30

"नगरपंचयतीचे जे निकाल आता समोर आले आहेत, त्यावरून जवळपास ३४ नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकत असल्याचं दिसून येतंय. त्याचप्रमाणे राज्यात ...

bjp leader rahul narvekar targeted shiv sena over nagar panchayat election results 2022 | गुलाल आमच्याच वाट्याला होता, मात्र तो दुसऱ्यांनी चोरून नेला; भाजप आमदाराचा शिवसेनेला खोचक टोला

गुलाल आमच्याच वाट्याला होता, मात्र तो दुसऱ्यांनी चोरून नेला; भाजप आमदाराचा शिवसेनेला खोचक टोला

"नगरपंचयतीचे जे निकाल आता समोर आले आहेत, त्यावरून जवळपास ३४ नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकत असल्याचं दिसून येतंय. त्याचप्रमाणे राज्यात ४५० पेक्षा अधिक जागा या भाजपच्या निवडून आल्या आहेत. भाजप हा सर्वात मोठी उमेदवार निवडून आणणारा पक्ष आहे. त्याचा जल्लोश कार्यकर्ते साजरा करत आहेत," अशी माहिती भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी दिली.

"आपण जर पाहिलं तर सत्तेतील सर्वात मोठा पक्ष शिवसेना हा चौथ्या क्रमांकावर आहे. एकूणच जनतेचा मनातला रोष, राग संताप जनतेनं या निवडणुकीच्या निकालातून व्यक्त केला आहे," असंही नार्वेकर यांनी नमूद केलं.

भाजप एक नंबरचा पक्ष ठरला यात कोणतंही दुमत नाही. यापूर्वीबी जनतेनं गुलाल आमच्याच वाट्याला दिला होता. परंतु तो दुसऱ्यांनी चोरून नेला. मात्र जनतेनं पुन्हा आम्हाला साथ दिली आहे. शिवसेना शिवसेना सत्तेतील सर्वात मोठा पक्ष असूनही चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारालाही जनता उत्तर देईल, असंही ते म्हणाले.

Web Title: bjp leader rahul narvekar targeted shiv sena over nagar panchayat election results 2022