शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तोडपाणी करणारे गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊच शकत नाहीत-पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 21:43 IST

पंकजा मुंडेंचा बंधू धनंजय मुडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

जिंतूर ( जि. परभणी ):  तोडपाणी करणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार होऊच शकत नाहीत, अशी टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे आयोजित जाहीर सभेत नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली. परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुंडे बोलत होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ब्रिटिशांनी माणसां-माणसांमध्ये भेद निर्माण करुन राज्य केले. तसे काँग्रेस- राष्ट्रवादीसारखे पक्ष करु पाहत आहेत. त्यांच्याकडून द्वेषाचे राजकारण केले जात असून आमच्याही कुटुंबात राष्ट्रवादीने भांडणे लावली. हे तर उदाहरण जगासमोर आहे. ज्या मातीत त्या लोकांचा विकास करण्याऐवजी स्वत:चे घर भरण्याचे काम राष्ट्रवादीने केले. व्यापारी, कंत्राटदार, मंत्री, अधिकारी यांच्या तक्रारी करुन त्यांच्या लक्षवेधी लावायच्या आणि मागच्या दाराने तोडपाणी करायचे, हा उद्योग या पक्षांच्या नेत्यांचा आहे. त्यामुळे तोडपाणी करणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे वारस होऊच शकत नाहीत, अशी टीका पंकजा यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली.तोडपाणी करणाऱ्या नेत्यांना हद्दपार करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना, स्वच्छ भारत अभियान या सारख्या जनहिताच्या योजना राबवून देशाची वेगळी ओळख निर्माण केली. ७० वर्षात जे काँग्रेसला जमले नाही, ते पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी करुन दाखविले. शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड,  माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार खा. संजय जाधव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, तालुकाप्रमुख राम शर्मा, अ‍ॅड. प्रताप बांगर, मेघना बोर्डीकर, सुरेश नागरे आदींची उपस्थिती होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparbhani-pcपरभणीDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा