शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

करावं तसं भरावं, आता...! यामुळं ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीनं राजकारण करू नये, नारायण राणेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 5:47 PM

भाजपकडून एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर, भाजप नेते नारायण राणे यांनी "करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई - राज्यातील ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh), यांच्या मुंबई आणि नागपूरातील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापे टाकले. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. यातच, आजपर्यंत या देशात एजन्सीजचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही, भाजपकडून एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर, भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी "करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (BJP leader Narayan Rane targets NCP over ED's action against Anil Deshmukh)

नारायण राणे म्हणाले, "ही कायदेशीर कारवाई आहे, राजकीय नाही. जसं मराठीत म्हण आहे, करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे. जे केलं त्याची चौकशी सुरू आहे. यामुळे यात कुणी राजकारण करू नये, राष्ट्रवादी काँग्रेसने तर करूच नये, आता हे सिद्ध होऊ द्या बाहेर येऊ द्या, मग बघू काय आहे ते.

Anil Deshmukh : मुंबईतल्या १० बार मालकांनी अनिल देशमुखांना तीन महिने ४ कोटी रुपये दिले; 'ईडी'चा धक्कादायक खुलासा!

खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत -आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. 

मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा - मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य दुमजली बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. त्या जागेची किंमत आताच्या घडीला १० कोटी आहे. या कामाला बहुतेक  पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरे यांचा गाइडन्स आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी करावी. अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओही दाखवला. यामध्ये एका बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Anil Deshmukh: “खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप

एजन्सीजचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन -सुळे म्हणाल्या, "राजकारण हे विचारांचं असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं.आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही, ऐकलेला नाही. एजन्सीजचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण नोटीस आली होती,अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात अस राजकारण कधी होत नाही,महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकाना त्रास देण्याकरता केला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणता ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं आहे हे दिसते आहे"

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNarayan Raneनारायण राणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय