शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

"सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:24 IST

Corona Vaccination Maharashtra : आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका. १ मेपासून देशभरात राबवण्यात येणार आहे व्यापक लसीकरण मोहीम

ठळक मुद्दे१ मेपासून देशभरात राबवण्यात येणार आहे व्यापक लसीकरण मोहीमकाँग्रेस नेते सत्तेपुढे लाचार, पडळकर यांची टीका

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आता लसीकरणाचाही पर्याय वापरला जात आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी आपल्या नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मोफत लसीकरणासाठी आग्रही असल्या तरी राज्यातील काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार असल्याची घाणाघाती टीका केली आहे. "वसूलीच्या मासिकतेचं असलेलं सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेताना किंवा पैसे खर्च करताना यांचे हात थरथर कापतायत. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी लसीकरणाची मोहीम जास्तीतजास्त राबवणं हा एकमेव पर्याय आहे. असं असताना लसीकणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार ठामपणे कोणतीही भूमिका घेत नाही. मंत्रिमंडळात मोफत लसीकरणावरून तू तू मै मै सुरू आहे," असं पडळकर म्हणाले."महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारनं मोफत लसीकरण केलं पाहिजे यासाठी सोनिया गांधी आग्रही आहेत. परंतु महाराष्ट्रातले मंत्री दोन्ही पक्षांपुढे नांगी टाकून बसले आहे. त्यांचं राज्य सरकारसमोर काही चालत नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचे मंत्री सत्तेपुढे लाचार झाले आहेत. सोनिया गांधींचंही ते ऐकत नाहीत अशी परिस्थिती राज्यात दिसत आहे," असंही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी