Maharashtra Politics: “दाऊद इब्राहिम होता म्हणून 'पावर'काका मुख्यमंत्री होते”; गोपीचंद पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 18:33 IST2023-02-04T18:31:57+5:302023-02-04T18:33:15+5:30
Maharashtra Politics: अफजल खान होता म्हणून शिवाजी महाराज होते ना; आव्हाडांच्या विधानावर भाजपचे खोचक प्रत्युत्तर.

Maharashtra Politics: “दाऊद इब्राहिम होता म्हणून 'पावर'काका मुख्यमंत्री होते”; गोपीचंद पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांना टोला
Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या एका विधानावरून भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, पवार कुटुंबीय यांच्यावर टोकाची टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओचा दाखला देत गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन असा उल्लेख करत निशाणा साधला आहे.
दाऊद इब्राहिम होता म्हणून 'पावर'काका मुख्यमंत्री होते
समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, असे जितेंद्र आव्हाड व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. यावर गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला. मुंब्रारक्षकाचा हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो की दाऊद इब्राहिम होता म्हणून 'पावर'काका मुख्यमंत्री होते,त्याच अभासातून कदाचित असे तुच्छ बोल बाहेर पडले असावेत.ध्यानात ठेवा,हिंदूरक्षक शिवछत्रपती महाराजांच्या शौर्याने व पुण्याईने तुमच्यासारखे काही 'जितुद्दीन'होता होता राहिले, असे ट्विट गोपीचंद पडळकर यांनी केले.
दरम्यान, भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांना मुघलप्रेमी म्हणत त्यांच्यावर जबरी टीका केली. जाहीर निषेध! मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितुजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुतीसुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नको. शेवटी'जित्या'ची खोड... तेच खरं, अशा शब्दात मंत्री चव्हाण यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"