शिवसेनेकडून भाजपनेते एकनाथ खडसे 'वेटींग'वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 16:26 IST2019-12-10T16:25:16+5:302019-12-10T16:26:43+5:30
शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे शिवसेनेच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते लवकरच भेटतील अशी शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट होणार की नाही, यावर अद्याप काहीही सांगता येणार नाही.

शिवसेनेकडून भाजपनेते एकनाथ खडसे 'वेटींग'वर
मुंबई - भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मनात काय सुरू आहे, याचा थांगपत्ता लागला नाही. खडसे यांनी नुकतीच दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता ते मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना शिवसेनेकडून सध्या तरी वेटींगवर ठेवण्यात आले आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे शिवसेनेच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते लवकरच भेटतील अशी शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट होणार की नाही, यावर अद्याप काहीही सांगता येणार नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले आहे. यामध्ये खडसे यांच्यासह तावडे आणि प्रकाश मेहता यांचा समावेश आहे. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. मुंडे यांनी देखील आपली नाराजी फेसबुकवरून व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे आणि तावडे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना बाजुला केले जात असल्याचे सांगण्यात येत होते.
दरम्यान खडसे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत होते. तर काँग्रेसकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे. अशीच चर्चा निवडणुकीपूर्वी देखील सुरू होती. मात्र भाजपकडून त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे बंड तात्पुरते शमले होते. आता पुन्हा एकदा खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे.