शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'टिकटिक' वाजते डोक्यात?; नाराज एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 17:39 IST

खडसे-पवार यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

नवी दिल्ली: भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. खडसे आणि पवार यांच्यामध्ये गेल्या १५ मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. खडसेंनी परवाच स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची शरद पवारांसोबतची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली. आपल्या मनातील खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे आज दिल्लीला पोहोचले. त्यावेळी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ६ जनपथवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीत जळगावमधील मुक्ताईनगरमधून पक्षानं एकनाथ खडसेंना तिकीट नाकारलं. यानंतर खडसेंनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला. या पराभवावरुनही खडसेंनी पक्षावर निशाणा साधला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपानं तिकीट कापल्यानंतर राष्ट्रवादी खडसेंना आपल्याकडे खेचण्यासाठी उत्सुक होती. त्यांना तिकीट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अजित पवार उत्सुक होते. मात्र त्यावेळी खडसेंनी भाजपात राहणं पसंत केलं. दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले खडसे?पक्षाच्या कोअर कमिटीतून मला काढून टाकण्यात आलं आहे.  मला आता निर्णय प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. जाणीवपूर्वक मला दूर करण्यात येत असेल तर मी काय भूमिका घेतली पाहिजे. काही लोकांकडून सातत्यानं अपमान होतोय. अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, अशा इशारा खडसेंनी भाजपाला दिला. 

बहुजन समाज आणि ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्ते आजही आम्हाला अन्याय होत असल्याचं सांगत असतात. ओबीसींवर अन्याय होतो की नाही याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. राज्यातल्या लोकप्रतिनिधी, माजी आमदार यांची जी भावना आहे. ती पक्षाच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आम्हाला जातीवर बोलायाचं नाही, पण जे घडलं आहे ते तर समोर आलंच पाहिजे. हे जर कोणी करत असेल, तर त्याला प्रतिबंध बसला पाहिजे.  

 

 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019