शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पवारांच्या भेटीनंतर 'मातोश्री'वर थेट; एकनाथ खडसे घेणार उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 7:14 PM

भाजपाच्या एकाही नेत्याची भेट न घेता खडसे राज्यात परतणार

नवी दिल्ली: भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर उद्या खडसे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. विशेष म्हणजे आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दिल्लीला गेलेले खडसे भाजपाच्या एकाही नेत्याला भेटल्याशिवाय मुंबईत परतणार आहेत. खडसेंनी परवाच स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त करत पक्षाकडून असाच अन्याय होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीगाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज आहेत. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. आपल्या मनातील हीच खदखद ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त करण्यासाठी खडसे आज दिल्लीला पोहोचले होते. मात्र त्यांनी भाजपाच्या एकाही नेत्याची भेट घेतली नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज लोकसभेत होते. मात्र राज्यसभा खासदार असलेल्या कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांचीही खडसेंनी भेट घेतली नाही. भाजपाच्या एकाही वरिष्ठ नेत्याला न भेटलेले खडसे संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी ६ जनपथवर पोहोचले. त्यांनी पवारांसोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नावर पवारांची भेट घेतल्याचं खडसेंनी सांगितलं. आता खडसे उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंनी वारंवार पक्षावर टीका केली आहे. वेगळा विचार करू, असा निर्वाणीचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे खडसे-ठाकरे भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस