शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

फडणवीस, महाजनांमुळे माझं तिकीट कापलं; खडसेंकडून पहिल्यांदाच नाव घेऊन गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 11:43 PM

माझं राजकारण संपवण्याचा डाव; खडसेंचे फडणवीस-महाजनांवर गंभीर आरोप

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं, असा खळबळजनक दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केला आहे. याआधी खडसे फडणवीस आणि महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करत होते. मात्र आता पहिल्यांदाच त्यांनी थेट फडणवीस आणि महाजन यांच्यावर नाव घेऊन आरोप केले आहेत. माझं राजकारण संपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, असा अतिशय गंभीर आरोप खडसेंनी केला आहे. यामुळे भाजपामधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करताना खडसेंनी कोअर कमिटीतील चर्चेचा संदर्भ दिला. 'कोअर कमिटीमध्ये तिकीट वाटपावर चर्चा झाली. त्यामध्ये 17-18 सदस्य होते. यातील अनेकजण माझ्या ओळखीचे होते. त्यांनी या बैठकीत झालेल्या घटनांची माहिती मला दिली. मला विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात फडणवीस आणि महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुढे काय झालं, याची तुम्हाला कल्पनाच आहे,' असं खडसेंनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. स्वत:चं राजकारण सरळ करण्यासाठी माझं राजकारण संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला, असा आरोप खडसेंनी केला. मला तिकीट का नाकारण्यात आलं, माझी चूक काय, याची विचारणा मी पक्षाकडे केली होती. मात्र मला समाधानकारक उत्तरं देण्यात आली नाही, असं खडसे म्हणाले. आधी प्रचारात संपूर्ण टीम काम करायची. यंदा मात्र केवळ देवेंद्र फडणवीस सगळीकडे प्रचारासाठी फिरत होते. नितीन गडकरीदेखील फारसे प्रचारात नव्हते. सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्या मतदारसंघात अडकून पडल्यानं त्यांनादेखील प्रचार करता आला नाही, असं खडसे म्हणाले.विधानसभा निवडणुकीवेळी जनाधार असलेल्या अनेक नेत्यांची तिकीटं कापण्यात आली, असं खडसे यांनी म्हटलं. निवडून येण्याची खात्री असलेल्या अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. याचा अंतिमत: फटका पक्षालाच बसला. आमच्या काही जागा पडल्या, असं म्हणत खडसेंनी तिकीट वाटपावेळी झालेल्या अन्यायावर पुन्हा एकदा भाष्य केलं. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजन