सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 07:51 PM2021-03-27T19:51:06+5:302021-03-27T19:54:02+5:30

Sachin Vaze: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली.

bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue | सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी उडवली सचिन सावंतांची खिल्लीसचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत - देवेंद्र फडणवीससचिन सावंतांना मी काय उत्तर देणार - देवेंद्र फडणवीस

मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue)

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचे बिंग फुटणार आहे. खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला. मी पहिली दोन पानंच दिली होती. नवाब मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

...म्हणून 'वाझेंचे मालक' अस्वस्थ आणि चिंतेत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला

सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत

देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असे रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही केली नाही. ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिली व मुंबई पोलीस ज्यांचं नाव स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगलं होतं, त्याला बदनाम करण्याचं काम केलं, आता तेच प्रश्न विचारत आहेत, असेही फडणवीस म्हणाले. 

Web Title: bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.