शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'मी काय आहे अन काय नाही, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा', चित्रा वाघ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 14:32 IST

Chitra Wagh reply to Mahebub Shaikh: चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई: राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना 'लाचखोर नवऱ्याची बायको', असा चित्रा उल्लेख केला होता. आता महेबूब शेख यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वाघ आहे वाघ…, कशी आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा', अशा शब्दात त्यांनी पलटवार केला.

वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ताराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काल नगरमध्ये भाषणादरम्यान चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. 'चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली होती. 

कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाहीशेख यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं. 'सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले, आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. मी काय आहे अन काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या,' अशा शब्दात चित्रा वाघ यांनी महेबूब शेख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांचं ट्विट :

बाप बदलणारे आम्ही नाहीयानंतर महेबूब शेख यांनी फेसबूकवरुन चित्रा वाघ यांच्या या टीकेला सडेतोर उत्तर दिलं. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ते म्हणाले,आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॅाग बाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कार्यवाही झाली तेव्हा सरकार कुणाच होत ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कार्यवाही केली होती याच उत्तर द्या. जस आम्ही म्हणतो की आमची नार्को करा, तस म्हणा नवर्याची पण नार्को करा… आम्ही बाप बदलणाऱ्याच्या बापालाही भित नाही, असं शेख म्हणाले. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा