शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

चित्रा वाघ यांचे संजय राठोडांसोबत मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:52 IST

व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून चित्रा वाघ या वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. (BJP leader Chitra Wagh)

ठळक मुद्दे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे.राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहेयाप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली आहे.

मुंबई -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh), वनमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathod) यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली आहे. याशिवाय त्यांनी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही माहिती दिली आहे. (BJP leader Chitra Wagh morphed photo with Sanjay Rathod goes viral complaint to cm and home minister)

त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल होते, चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या 

राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का?व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. यासंदर्भात एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

...तोपर्यंत सहन करावेच लागणार -वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंटचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

“वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्रा वाघ यांच्यासारखी ‘वाघा’ला साजेशी भूमिका घ्या”

त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल होते - सॅमसंग गॅलक्झी एस10 लाईट ग्रे कलरचा फोन आहे, या फोनच्या डिस्प्लेवर 45 कॉल हे संजय राठोडचे दिसत आहेत. ज्या दिवशी पूजा चव्हाणची आत्महत्या झाली, त्याचदिवशी हे 45 मिस कॉल्स आले होते, याचं स्पष्टीकरण पोलीस देणार आहेत का, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना विचारला. मग, हा संजय राठोड कोण आहे, हेही पोलिसांनी सांगाव. पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पोलीस महासंचालकांनी हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन, एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही चित्राव वाघ यांनी केली.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा