शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

…तर बाळासाहेब ठाकरे वरुन संजय राऊतांच्या थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटील यांचं सणसणीत प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 4:12 PM

संजय राऊत जर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला बसले तर बाळासाहेब वरुन त्यांच्या थोबाडीत मारतील, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Chandrakant Patil: संजय राऊत जर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला बसले तर बाळासाहेब वरुन त्यांच्या थोबाडीत मारतील, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी देश आज काँग्रसेच्याच पुण्याईवर उभा आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राऊतांचा जोरदार समाचार घेतला. 

अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर...; चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा

"संजय राऊत यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर चिंतन करायला पाहिजे. त्यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांना हा प्रश्न विचारावा. मग बाळासाहेब ठाकरेही वरुन संजय राऊत यांच्या थोबाडीत मारतील", अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. "मला संजय राऊत यांच्यावर रोज टीका करायला आवडत नाही. मात्र ते रोज काहीतरी बोलतात मग मलाही उत्तर द्यावं लागतं", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

अजित पवारांना दिला सांभाळून बोलण्याचा इशाराचंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र झोपेत असतानाच सरकार पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य झोपेत असताना केलं की जागं असताना असा मिश्कील टोला हाणला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला.

"झोपेत कसं सरकार आणायचं हे अजित दादांनाच चांगलं माहित आहे. खुद्द शरद पवार झोपेत असताना त्यांनी सरकार आणलं होतं हे ते विसरलेत का? ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तीन दिवसांचं का होईना पण सरकार स्थापन केलंत त्यांच्यावर टीका करताना जरा तरी विचार करा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यासोबतच "अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे. जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल", असा थेट इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे अजित पवार आणि चंदक्रांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा