शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

"सुप्रिया सुळे यांचा तो आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणं," भातखळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:01 IST

आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य.

“आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. माझं हे बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावरुन भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला.

“अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा कोणताही दोष नसताना त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे, हा सुप्रिया सुळे यांचा आरोप म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाणे आहे. देशमुखांची चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. मलिक यांच्याबाबतीत प्रत्येक न्यायालयाने प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे सांगितले आहे,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंना टोला लगावला.काय म्हणाल्या होत्या सुळे?“दोन्ही केसेस मध्ये काय होतंय हे मला माहित आहे. कशाप्रकारे जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तुम्ही डेटा काढून पाहा, जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. त्यांचा जागतिक विक्रम आहे. त्यांनी १०९ वेळा देशमुख कुटुंबीयांच्या घरी धाड टाकली आहे. १०८ वेळा धाड टाकताना काय केलं? १०९ व्यांदा धाड टाकावी लागली कारण त्यांना १०८ वेळा काहीच मिळालं नाही.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

“हे सर्व आश्चर्यचकित करणारं आहे. ज्या व्यक्तीवर सर्व व्यक्तीवर आरोप आहेत, तोच आच माफीचा साक्षीदार होतोय, हे दुसरं आश्चर्य आहे. ज्यांनी स्वत: कबुल केलंय तो आज माफीचा साक्षीदार कसा बनू शकतो, हा कोणता न्याय आहे. मोदीजी तुम्ही हा कोणता न्याय करताय असं मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना संसदेत विचारणार आहे. मी मोदीजींपासून नाराज नाही पण नक्कीच आश्चर्य वाटतंय की हे काय होतंय?,” असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtraमहाराष्ट्र