Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन?, राष्ट्रपतींवरील वक्तव्यावरून भाजप नेत्याचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:47 IST2022-07-28T13:47:14+5:302022-07-28T13:47:49+5:30
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला.

Adhir Ranjan Chowdhury on Droupadi Murmu: हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन?, राष्ट्रपतींवरील वक्तव्यावरून भाजप नेत्याचा निशाणा
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला. भाजपाने काँग्रेसवर टीका केली असून चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. काही भाजपा नेत्यांनी चौधरी यांचे वक्तव्य माफी मागण्या लायक नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीका केली आहे.
“हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन? त्यांनी केलेला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख काँग्रेसची घटिया मानसिकता दर्शवणारा आहे. काँग्रेस देशाला वारंवार लायकी का दाखवते आहे,?” असं म्हणत भातखळकर यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला.
हे अधीर रंजन आहेत की बधीर मनोरंजन ? त्यांनी केलेला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख काँग्रेसची घटिया मानसिकता दर्शवणारा आहे. काँग्रेस देशाला वारंवार लायकी का दाखवते आहे?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2022
काय आहे प्रकरण?
द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्द प्रयोग चौधरी यांनी केला होता. यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली स्मृती इराणी यांनीदेखील त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
माफी मागण्याच्या मागणीवरून अधीर रंजन चौधरी यांनी माझ्याकडून चुकून राष्ट्राची पत्नी असा शब्द निघाला. एकदा चूक झाली तर मी काय करू? यावरून मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.