पवारांचा 'तो' व्हिडीओ अर्धवट शेअर केल्यानं भाजप अडचणीत; गृह विभाग कारवाईच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:56 PM2022-05-12T15:56:28+5:302022-05-12T15:59:02+5:30

शरद पवारांचा व्हिडीओ अर्धवट शेअर करणं भाजपला महागात पडण्याची शक्यता

BJP in trouble for sharing sharad Pawars partial video Home Department might take action | पवारांचा 'तो' व्हिडीओ अर्धवट शेअर केल्यानं भाजप अडचणीत; गृह विभाग कारवाईच्या तयारीत

पवारांचा 'तो' व्हिडीओ अर्धवट शेअर केल्यानं भाजप अडचणीत; गृह विभाग कारवाईच्या तयारीत

Next

मुंबई: राज्याचं राजकारण सध्या हिंदुत्वाच्या भोवती फिरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप महाराष्ट्रानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करत शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहे. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असं भाजपनं म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओवरून भाजप गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण अर्धवट व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या हालचाली गृहविभागानं सुरू केल्या आहेत. 

भाजपनं शेअर केलेला व्हिडीओ अर्धवट असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून पवारांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पवारांनी कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा आशय साताऱ्याच्या सभेत सांगितला. तो व्हिडीओ राष्ट्रवादीकडून ट्विट करण्यात आला. याशिवाय जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचे फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत.

झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीकडून भाजपला लगावण्यात आला आहे. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे. पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती, अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

शरद पवारांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडीओ शेअर करून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल, याची चाचपणी गृह विभागानं सुरू केली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे अर्धवट व्हिडीओ शेअर करणं भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP in trouble for sharing sharad Pawars partial video Home Department might take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.