भाजप सरकार श्रीमंत आणि दलालांचे; अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 22:22 IST2019-03-25T22:22:08+5:302019-03-25T22:22:26+5:30
उत्तर भारतीय समाज खारघर यांच्यावतीने शहरातील उत्कर्ष हॉल येथे आयोजित होळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.

भाजप सरकार श्रीमंत आणि दलालांचे; अजित पवार
पनवेल : भाजप सरकार श्रीमंत आणि दलालांची सरकार आहे. मोदींनी पुत्रधर्म, राजधर्म पाळला नाही. केवळ दोनच लोक भारत देश चालवत आहेत. अशा प्रवृत्तीला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. अच्छे दिन कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच आघाडीच्या उमेदवारांना निवडणून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी सोमवारी खारघर येथे केले.
उत्तर भारतीय समाज खारघर यांच्या वतीने शहरातील उत्कर्ष हॉल येथे आयोजित होळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.उपस्थित उत्तर भारतीय समाजाच्या पदाधिका-यांशी पवारआहे यांनी हिंदी बोली भाषेत संवाद साधला .या मेळाव्याला मोठया संख्येने उत्तर भारतीय उपस्थित होते .मावळ लोकसभा मतदार संघात यावेळी पार्थ पवार च्या रूपाने तरुण उमेदवार राष्ट्रवादीने दिला आहे . या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले .राष्ट्र्वादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी देखील भाजप सरकार वर टीका करत .
पार्थ पवार च्या उमेदवारीचे समर्थन करीत पार्थ पवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक, प्रमोद हिंदुराव, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ,नगरसेवक सतीश पाटील , आर .सी घरत, नगरसेवक हरेश केणी, सुदाम पाटील, बळीराम नेटके आदी उपस्थित होते.