शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार, संग्रामसिंह देशमुख उद्या अर्ज भरणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 3:49 PM

कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने  घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

ठळक मुद्देकडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणारसंग्रामसिंह देशमुख उद्या अर्ज भरणार 

सांगली : कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने  घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सध्या ते पार पाडत आहेत. माजी आमदार दिवंगत संपतराव देशमुख यांचे ते चिरंजीव आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना काँगेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

 उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कडेगाव यांच्याकडे विश्वजीत कदम यांचा अर्ज दाखल करताना माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार सतेज पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, विजयमाला कदम, स्वप्नाली विश्वजीत कदम  उपस्थित होते.  यावेळी विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दर्शवला आहे. भाजप या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार कि,  पाठिंबा देणार याची चर्चा होती, परंतु या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.  भाजपने उमेदवार न देता, ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती  माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. 

ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे.  पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१  मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकPatangrao Kadamपतंगराव कदम