Chitra Wagh : "भाजपाविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही"; चित्रा वाघ यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 14:32 IST2024-03-31T14:22:42+5:302024-03-31T14:32:41+5:30

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over statement on Electoral Bonds | Chitra Wagh : "भाजपाविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही"; चित्रा वाघ यांचा पलटवार

Chitra Wagh : "भाजपाविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही"; चित्रा वाघ यांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपाची केविलवाणी अवस्था झालेली आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यातून जनतेसमोर आलेलं आहे. निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलीत करण्यासाठी केजरीवालांना अटक करण्यात आलेली आहे" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला. आज सकाळी त्यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधला. 

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. "भाजपाविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही" असं म्हणत पलटवार केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "आताही ४०० पारचं उद्दिष्ट साध्य करून भाजपसह महायुतीचा विजयरथ दिमाखात उधळणार" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

"उद्धवजी…..! गद्दारीचा घिसापीटा राग आळवताना आपण आमच्या पाठीत खंजीर खुपसलात, हे तुम्ही विसरू नका. अशा खंजीरखुपशांसोबतची तुमची आघाडी म्हणजे भ्रष्टाचारातल्या समस्त ढवळ्या-पवळ्या जमातीचं मनोमीलन आहे. त्यामुळे भाजपविरोधात आरोपांचा खोटा हंबरडा फोडून काही साध्य होणार नाही…."

"जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे; कारण मोदीजी आपल्या दिलेल्या प्रत्येक गॅरंटीला जागलेत. आताही ४०० पारचं उद्दिष्ट साध्य करून भाजपसह महायुतीचा विजयरथ दिमाखात उधळणार…मागच्या दोन्ही वेळांप्रमाणे जनता तुमची वेसण करकचून आवळणार…" असंही चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over statement on Electoral Bonds