Chitra Wagh : "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:47 IST2023-07-11T10:18:27+5:302023-07-11T10:47:03+5:30

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over BJP Devendra Fadnavis Statement | Chitra Wagh : "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी"

Chitra Wagh : "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा, राज ठाकरेंना बाजूला करून घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी"

उद्धव ठाकरे यांनी नागपुरात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पाठीत वार केल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. "फडणवीस उपमुख्यमंत्री पण त्यांच्यावर काय बोलायचे. त्यांची हालत अशी विचित्र झालीय की सहनही होत नाही. मी पुन्हा येईन असे बोललो होतो. मी एकटा नाही आलोय, दोघांना घेऊन आलोय" असे फडणवीस म्हणाले होते. मी त्यांची एक क्लिप दाखवतो असं सांगत, नाही नाही नाही... एकवेळ लग्न करणार नाही... या भाषणाची क्लिप दाखवली. यानंतर फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा कलंक तुमच्या माथी… राज ठाकरेंना बाजूला करून स्वतःचच घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी…असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच तुमच्यावरील कलंकाची ही यादी संपणारी नाही. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा झाला नाही तो राज्याच्या जनतेचा कसा होणार? असा सवाल देखील केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"उद्धव जी… बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याचा कलंक तुमच्या माथी…
हिंदुहदयसम्राटचे जनाब बाळासाहेब केल्याचा कलंक तुमच्या माथी…
देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा कलंक तुमच्या माथी…
राज ठाकरेंना बाजूला करून स्वतःचच घर फोडल्याचा कलंक तुमच्या माथी…
पुत्रमोहात अडकून मंत्रीपदी बसवल्याचा कलंक तुमच्या माथी…
हनुमान चालिसाला विरोध करण्याचा कलंक तुमच्या माथी…
कोविड काळात कंत्राट घेतल्याचा कलंकही तुमच्या माथी…
तुमच्यावरील कलंकाची ही यादी संपणारी नाही. अरे, जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा झाला नाही तो राज्याच्या जनतेचा कसा होणार? हे कलंक घेऊन लोकांच्या दारी गेलात तर कोणी उभंही करणार नाही तुम्हाला…" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"देवेंद्रजींनी तुम्हाला लोळवलंय, आसमान दाखवलंय"

"उद्धवस्थ ठाकरेजी... सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी आमचे नेते देवेंद्रजीं वर टीका करावी एवढीही तुमची लायकी नाही. तुमची चिडचिड, मळमळ, गरळ… ही अवस्था मी समजू शकते. देवेंद्रजींनी तुम्हाला लोळवलंय, आसमान दाखवलंय. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी देवेंद्र फडणवीसजी काय आहेत हे जाहीरपणे सांगितलं आहे. देवेंद्रजी या राज्याची शान आहेत. आमचा मान-सन्मान आहेत" असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 
 

Web Title: BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over BJP Devendra Fadnavis Statement