शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

Chandrashekhar Bawankule : "घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 14:28 IST

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच, शिवसेना हे पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. यावरून भाजपाने आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

"हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) य़ांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते?" असा सवालही विचारला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात?"

"उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा!! पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत? घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता.!! उद्धव ठाकरेजी, चर्चा तर होणारच!" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं"

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला याआधी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात" अशा शब्दांत निशाणा साधला. यासोबतच "शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले" असंही म्हटलं आहे.

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेPoliticsराजकारण