Chandrasekhar Bawankule : "उद्धव ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, ते अस्वस्थ होतात तेव्हा..."; भाजपाचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:23 IST2022-10-12T16:15:24+5:302022-10-12T16:23:32+5:30
BJP Chandrasekhar Bawankule And Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून वारंवार शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधण्यात येत आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrasekhar Bawankule : "उद्धव ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, ते अस्वस्थ होतात तेव्हा..."; भाजपाचा घणाघात
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयोगाने गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे राहील. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. याच दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून वारंवार शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधण्यात येत आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरे हे आपला दिवसभरातील राग सामनाच्या अग्रलेखात व्यक्त करतात. ज्या ज्या वेळी ते अस्वस्थ होतात. तेव्हा ते काहीतरी लिहीतात आणि सामनात छापतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेण्याची गरज नाही" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील"
चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधी देखील काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. "भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील" असा सूचक इशाराही बावनकुळेंनी दिला होता. तसेच "उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाही. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं" असं म्हणत निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही बोचरी टीका केली. "राष्ट्रवादीमध्ये काही लोकांचं भलं झालं. जे 50 प्रमुख नेते आहेत तेवढ्याच लोकांचं भलं झालं. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे" असं म्हटलं होतं.
"एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं"
"काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये, उद्धवजींकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत. उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाहीत. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटलं असा आक्षेप हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोकांचं भलं झालं. जे 50 प्रमुख नेते आहेत तेवढ्याच लोकांचं भलं झालं. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील... जसं जसं 2024 जवळ येईल" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"