शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

"शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत"; भाजपाचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 20:34 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : बीड गर्भपात प्रकरणी एका महीलेचा मृत्यू झाला आहे. गोठ्यात गर्भपात करणाऱ्या संबंधित डॉक्टरांना खुनाचे कलम लावून अटक करावी, अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे.

मुंबई - शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis)  यांचे नवे सरकार आले. यानंतर भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत केले असून, भाजप मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे (Dahi Handi 2022) आयोजन केले आहे. या खेळीने आशिष शेलार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान आता भाजपाने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. "शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी "आमचे थर कोसळणार नाही हा शिवसेनेचा दावा योग्यच, कारण शिवसेना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात कोसळली असून या पक्षात आता थर उरलेच नाहीत. त्यांचा भ्रष्टाचार, त्यांचा उर्मटपणा, त्यांची मस्ती या सगळ्यांना मुंबईकर जनता यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून उत्तर देणार आहे" असं म्हटलं आहे. तसेच "मुंबईत खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्युला शिवसेनेचा महापालिकेतील भ्रष्टाचार कारणीभूत. काळया यादीतील निलंबित भ्रष्ट अभियंत्यांना पुन्हा कामावर घेऊन प्रमोशन दिले" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

बीड गर्भपात प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गोठ्यात गर्भपात करणाऱ्या संबंधित डॉक्टरांना खुनाचे कलम लावून अटक करावी, अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी देखील आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे..." असं म्हणत निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे..." आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत... लवकरच... मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत "करुन दाखवतील" आमचं ठरलंय!!" असं म्हटलं आहे. 

"ज्या वरळीत सेनेच्या (?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे  पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला "बळ"  अपुरे पडतेय... दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय..." असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीची सुरुवात युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव जांबोरी मैदानात हा उत्सव पार पडणार आहे.  

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना