Atul Bhatkhalkar : "पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 14:46 IST2022-09-05T14:30:47+5:302022-09-05T14:46:25+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams Jitendra Awhad : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Atul Bhatkhalkar : "पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत"
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. "इंग्लंडचा जीडीपी ३.२ ट्रिलियन आहे. भारताचा ३.५ ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त ६.८ कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. आपल्याला १४० कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो!" असं म्हणत खोचक टोला लगावला होता. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत. ३.५ ट्रिलियनचा टप्पा गाठून आपण इंग्लंडला मागे सारले ही त्यांच्या दृष्टीने achivement नाही. पण मग हे ७० वर्षात काँग्रेसला का झेपले नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हे शक्य कसे झाले?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 5, 2022
३.५ ट्रिलियनचा टप्पा गाठून आपण इंग्लंडला मागे सारले ही त्यांच्या दृष्टीने achivement नाही.
पण मग हे ७० वर्षात काँग्रेसला का झेपले नाही?पंतप्रधान @narendramodi यांनाच हे शक्य कसे झाले? pic.twitter.com/uKzspC0FpJ
जितेंद्र आव्हाड यांनी याआधी आणखी एक ट्वीट करत भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. "भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रथमच भारतावरील इतर देशांचे कर्ज अर्थात विदेशी कर्ज एकूण ६२०.७० अब्ज डॉलर्स पार गेले असून ते परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे. एकीकडे महागाईने कहर केलेला असताना देशावर मोठ्या प्रमाणावर वाढते कर्ज कशाचे द्योतक आहे?" असं म्हटलं होतं.