शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपावर सेनेचा ‘अवकाळी’ हल्ला!

By admin | Updated: March 11, 2015 02:40 IST

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. त्यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली. अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील या सेनेच्या आमदारांनी घणाघाती भाषण केल्याने सत्ताधारी बाकांवर बरीच चुळबुळ झाली.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावर विधानसभेत तातडीने चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी पक्षांनी नियम ९७ आणि ५७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा सुरू करण्यात अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर भाजपा आमदारांनी २९३ अन्वये याच विषयावर चर्चा आणली. पण ती शिवसेनेने त्यांच्यावर उलटवली. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात सेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री हजर नव्हते. त्यामुळे शिवसेनेने भाजपाचा हा सुनियोजित ‘कार्यक्रम’ केल्याची चर्चा विधिमंडळात रंगली.पाच मिनिटांच्या सभात्यागानंतर सभागृहात परत आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही चर्चेत सहभाग घेत सेनेच्या आमदारांना डिवचले. ‘सरकारला कधी जाब विचारणार?’ असा बाण छगन भुजबळ यांनी सोडला आणि तो नेमका सेनेच्या वर्मी लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीने उसाला ६ हजारांचा भाव दिला, तुम्ही त्यांच्यापेक्षा निदान दोनतीनशे रुपये तरी जास्तीचे द्या, कोणत्या तोंडाने आम्ही मतदारसंघात जायचे ते तरी सांगा, अशा शब्दांत आ. खोतकर यांनी सरकारवर हल्ला चढवला; तेव्हा विरोधी सदस्यांनी जोरजोरात बाके वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. सरकारी पक्षाच्या सदस्यांनी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांचा असा सहभाग पाहून सत्ताधारी बाकावरील सदस्य चिडीचूप बसले होते. (विशेष प्रतिनिधी)