"घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:47 IST2024-02-10T16:47:03+5:302024-02-10T16:47:40+5:30
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला.

"घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?"
राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय?" असं म्हणत निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी श्रीमान उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कशासाठी? सत्तेसाठी? देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देताय? कशासाठी? अहो, ज्या कुटुंबाचे तुम्ही स्वतःला प्रमुख म्हणवून घेता, त्या कुटुंबातील घोसाळकरांचे दु:ख काळीज कुरतडून टाकणारे आहे."
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणी श्रीमान उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 10, 2024
◆ कशासाठी? सत्तेसाठी?
◆ मा.देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देताय?
◆ कशासाठी?
अहो,
ज्या कुटुंबाचे तुम्ही स्वतःला प्रमुख म्हणवून घेता, त्या कुटुंबातील घोसाळकरांचे दु:ख काळीज कुरतडून टाकणारे…
"घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? आणि अशा वेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय? करतात काय? तर शब्दांच्या कोट्या? टोमणे? एक कुटुंबावर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळा आहे किंबहुना सगळ्यांसाठीच हा प्रसंग दु:खाचा आहे... अशावेळी श्रीमान उद्धव ठाकरे सत्तेसाठी धडपड करीत आहेत. मग आता मला सांगा... खरे लोमडी कोण?" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
"उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
उद्धव ठाकरेंना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon" असा खोचक टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरेंची भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत. ते पाहिल्यावर आता माझं ठाम मत झालेलं आहे की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यामुळे मी Get Well Soon एवढंच म्हणेन" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.