शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपा-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 'या' जागांची अदलाबदल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:12 IST

Maharashtra Assembly Election 2019: 20 ते 25 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठीशिवसेना, भाजपामधलं जागावाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी 20 ते 25 जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. जागावाटप करण्यासाठी शिवसेना, भाजपानं फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार जागावाटप करताना दोन्ही पक्षात झालेलं जोरदार इनकमिंग आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांचा विचार केला जाईल. शिवसेना, भाजपाच्या काही पारंपारिक जागा निश्चित आहेत. मात्र आता यात बदल केला जाईल. त्यामुळे 20 ते 25 जागांची अदलाबदल करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. याचा विचार करुन यंदा युतीचं जागावाटप होईल. याशिवाय गेल्या दोन निवडणुकांतील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारीदेखील विचारात घेण्यात येईल.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी वडाळा मतदारसंघात भाजपाला अवघ्या 700 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसनं ही जागा जिंकली होती. मात्र वडाळ्यात बाजी मारणारे कालिदास कोळंबकर भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळू शकते. तर सिल्लोडची जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते. 2014 मध्ये अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून विजय मिळवला होती. मात्र काही दिवसांपूर्वीच सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर उस्मानाबादच्या कळंबचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या भाजपा प्रवेशामुळे हा मतदारसंघदेखील भाजपाला मिळू शकतो. गोरेगावचा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेसाठी सोडला जाऊ शकतो. 2014 मध्ये भाजपाच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेच्या सुभाष देसाईंचा पराभव केला होता. मात्र ही जागा भाजपाकडून सोडली जाऊ शकते.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस