शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 1:43 PM

Param Bir Singh Letter: भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपरमबीर सिंग पत्र प्रकरणावरून ठाकरे सरकारला घेरले महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विरोधक आग्रहीआंबेडकर, आठवले राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहेत. भाजपने आक्रमक पवित्रा घेत, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. (bjp and other parties demands president rule in maharashtra over param bir singh letter)

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. तर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या भेटीला

राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. 

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

प्रकाश आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले, हे स्पष्ट केलं आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभं राहिलेलं आहे. राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

रामदास आठवले राज्यपालांना भेटणार

महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याच्या मागणीचे पत्र अमित शाह यांच्याकडे देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

केंद्राने हस्तक्षेप करण्याची राज ठाकरेंची मागणी

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे गंभीर आहेच. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही.  केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. केंद्रीय तपास संस्थांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यानंतर फटाक्यांच्या माळा लागतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण