शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपचे १६ विद्यमान आमदार वेटिंगवर! ७९ आमदारांना पुन्हा संधी, एका आमदाराचा पत्ता कट

By दीपक भातुसे | Updated: October 21, 2024 13:06 IST

पहिल्या यादीत स्थान नसल्याने तिकीट कापले जाण्याची भीती

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजपने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत विद्यमान १६ आमदारांच्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर न करता या आमदारांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे आपले तिकीट कापले जाणार अशी भीती या आमदारांना आहे. यात काही आमदारांना मतदारसंघातून विरोध होत असल्याने तर काही ठिकाणी आमदारांची कामगिरी सुमार असल्याने त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. विद्यमान ७९ आमदारांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिले असून एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर ४ विद्यमान आमदारांऐवजी त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नागपूर मध्य मतदारसंघातील आमदार विकास कुंभारे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघात हलबा मतदारांचे वर्चस्व असून इथून हलबा समाजाचे असलेले विधानपरिषद आमदार प्रवीण दटके इच्छुक आहेत. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचे नावही यादीत नसून या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखेडे हे मागील अनेक महिन्यांपासून तयारी आणि प्रचार करत आहेत.

गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कामगिरीवर पक्षात नाराजी असून लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप उमेदवाराला आघाडी मिळाली नव्हती. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या कामगिरीबाबतही नाराजी असल्याने त्यांचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. याशिवाय वाशिमचे लखन मलिक, उमरखेडचे नामदेव ससाणे यांचीही नावे पहिल्या यादीत नाहीत.

नाशिक मध्य मतदारसंघातही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. इथे देवयानी फरांदे विद्यमान आमदार आहेत. माजी स्थायी समिती सभापती सुरेश अण्णा पाटील यांना उमेदवारी हवी आहे. लोकसभेत सोलापूर मतदारसंघातून पराभूत झालेले विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकारी विरोध करत आहेत.  त्यामुळे त्यांचे नाव यादीत आलेले नाही. याशिवाय पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, गेवराई लक्ष्मण पवार, खडकवासला भीमराव तापकीर पेणचे रवीशेठ पाटील या आमदारांना कामगिरीच्या मुद्द्यावर वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे समजते.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली होती. भाजपने पहिल्या यादीत या मतदारसंघातही उमेदवार दिलेला नाही.

दोन रिक्त जागांवर उमेदवारी कुणाला?

- अकोला पश्चिमचे गोवर्धन शर्मा व कारंजाचे आमदार राजेंद्र पाटनी यांच्या निधनाने आणि इथे पोटनिवडणूक न झाल्याने या जागा रिक्त होत्या. - अकोला पश्चिममध्ये गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा इच्छुक असून इथे घरात उमेदवारी द्यायची की दुसऱ्याला संधी द्यायची याचा निर्णय होत नाही. - कारंजा मतदारसंघातही तोच मुद्दा आहे. राजेंद्र पाटनी यांचा मुलगा ग्यायक पाटनी हे इच्छुक असून मुलाला उमेदवारी द्यायची की दुसऱ्याला याचा निर्णय पक्षाने घेतलेला नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघातही भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

पहिल्या यादीत १३ महिला

पहिल्या यादीत १३ महिलांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यात श्रीजया अशोक चव्हाण (भोकर), अनुराधा चव्हाण (फुलंब्री), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा) ही चार नवीन नावे आहेत. विद्यमान ९ महिला आमदार श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जितूर), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव), नमिता मुंदडा (केज) पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024BJPभाजपाMumbaiमुंबई