शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

TET Exam: राज्यात मोठी शिक्षक भरती! टीईटी परीक्षेचा कालावधी ठरला; ठाकरे सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 17:42 IST

Teacher recruitment in Maharashtra: राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Teacher Job: गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा एकदा पास झाली की आजीवन वैधता राहणार असल्याने शिक्षक होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात एकूण 40 हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्या टप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत. (Maha TET Exam schedule declaired By Education Department.)

राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 27 हजार, माध्यमिकमध्ये 13000 अशा 40 हजार जागा रिक्त आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा घेण्यात आली नव्हती. 2018-19 मध्ये अखेरची परीक्षा झाली होती. यामुळे यंदा उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 लाख उमेदवार परीक्षेला बसतात. ते यंदा तीन लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 8 जुलै रोजी राज्यातील 6100 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली होती. ही भरती प्रक्रिया कोरोना संकटामुळे पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केला होता. यानुसार टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीMaharashtraमहाराष्ट्र