शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 11:15 IST2023-07-02T11:12:52+5:302023-07-02T11:15:09+5:30

NCP Vs Shiv Sena Shinde Group: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

big shock to party chief sharad pawar 12 zilla parishad members of ncp will join shiv sena shinde group | शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत करणार प्रवेश

NCP Vs Shiv Sena Shinde Group: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा तसेच अन्य निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारी करत असून, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाला रामराम करणे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. 

परभणी जिल्ह्यातील १२ जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, बाजारा समितीचे संचालक, पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सगळे पदाधिकारी परभणीकडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळ पार पडणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या गळतीने राष्ट्रवादीला परभणीत मोठे खिंडार पडणार आहे.

सर्वात मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे

मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इतर पक्षातून होणारे इन्कमिंग वाढल्याचे दिसत आहे.यादरम्यान आजवरचा सर्वांत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास १२ विद्यामान जिल्हा परिषद सदस्य हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये चार सदस्य हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार दुर्रानी यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार, गोदावरी सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष यासोबतच पंचायत समितीचे संचालक शिवसेनेत दाखल होणार आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: big shock to party chief sharad pawar 12 zilla parishad members of ncp will join shiv sena shinde group