दे धक्का! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:40 PM2021-02-10T13:40:53+5:302021-02-10T13:44:48+5:30

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.

big setback for ram kadam bjp volunteers join MNS because of avinash jadhav | दे धक्का! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश

दे धक्का! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश

Next
ठळक मुद्देअविनाश जाधव यांचा राम कदम यांना दे धक्काशिवसेना, भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी केला मनसेत प्रवेशमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी झाला सोहळा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राम कदम यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या अनेक समर्थकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. (big setback for ram kadam bjp volunteers join MNS because of avinash jadhav)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. ठाण्यासह वसई, विरार या भागातील शेकडो शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यात राम कदम (Ram Kadam) यांच्या समर्थकांचा समावेश होता. 

ठाण्यात मनसेची ताकद वाढली

गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला होता. त्याआधी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना तसेच भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षांना सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता. 

 

अदानींचा बंदर उद्योग तेजीत; तीन महिन्यांत १६ टक्क्यांच्या वाढीसह तब्बल १५७३ कोटींचा नफा

औरंगाबादमधूनही मनसेत इनकमिंग

शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला होता. चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती धरला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मनसेत

जुन्या नांदेडमधील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी मनसेमध्ये प्रवेश केला. यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार असून, मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे पक्ष बांधणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: big setback for ram kadam bjp volunteers join MNS because of avinash jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.