महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल! गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:24 IST2026-01-30T18:23:34+5:302026-01-30T18:24:09+5:30

Manisha Patankar Mhaiskar ACS Home Maharashtra: राज्याच्या गृह विभागाची सूत्रे आता मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या हाती! अतिरिक्त मुख्य सचिव (ACS Home) म्हणून त्यांची नियुक्ती.

Big reshuffle in Maharashtra administration! Manisha Patankar-Mhaiskar appointed as Additional Chief Secretary of Home Department | महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल! गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रशासनात मोठे फेरबदल! गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती

मुंबई: महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल करण्यात आले असून, ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पदावर एका अनुभवी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने प्रशासकीय वर्तुळात त्याचे स्वागत होत आहे.

मनीषा पाटणकर-म्हैसकर या १९९२ च्या बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाची जबाबदारी होती. त्यांच्याजागी आता मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ जानेवारीला त्यांना मिलिंद म्हैसकर यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गृह विभागाला मिळणार नवी गती?
गृह विभाग हा थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. या विभागात अतिरिक्त मुख्य सचिव हे पद पोलीस दलाचे प्रशासन, बदल्या आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी कणा मानले जाते. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या नियुक्तीमुळे गृह विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title : महाराष्ट्र प्रशासन में बड़ा फेरबदल; मनीषा पाटणकर-मैस्कर को गृह विभाग।

Web Summary : मनीषा पाटणकर-मैस्कर गृह विभाग की अतिरिक्त मुख्य सचिव नियुक्त। अनुभवी आईएएस अधिकारी प्रशासनिक विशेषज्ञता लाएंगी। मिलिंद म्हैसकर ने लोक निर्माण में उनकी जगह ली। गृह विभाग में नई गति अपेक्षित।

Web Title : Major reshuffle in Maharashtra administration; Manisha Patankar-Maiskar gets Home Department.

Web Summary : Manisha Patankar-Maiskar appointed Additional Chief Secretary of Home Department. Experienced IAS officer brings administrative expertise. Milind Mhaiskar replaces her in Public Works. New momentum expected in Home Department.