राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...

By दीपक भातुसे | Updated: February 9, 2026 08:19 IST2026-02-09T08:12:14+5:302026-02-09T08:19:26+5:30

राष्ट्रवादीचे विलीनीकरण होण्याच्या चर्चेमुळे महत्त्वाची तयारी सुरू

Big political earthquake in the state? Maha Vikas aghadi on the verge of a split; 'Ekla Chalo Re' chant in Congress due to NCP Merger | राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...

राज्यात मोठा राजकीय भूकंप? मविआ फुटीच्या उंबरठ्यावर; काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर, कारण...

दीपक भातुसे

मुंबई - राष्ट्रवादीमधील  संभाव्य विलिनीकरणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये 'एकला चलो रे'चा सूर उमटत आहे. यासंदर्भात काँग्रेस अधिकृत निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीतूनही बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकारणाला धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातील काँग्रेसचे नेते याबाबत लवकरच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार असल्याचेही समजते.

राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना हे प्रमुख पक्ष राहतील. काँग्रेसने महापालिका निवडणुकीत मुंबईत उद्धव सेनेबरोबर युती करण्यास नकार दिला  देऊन स्वबळावर निवडणूक लढवली होती. वैचारिक भूमिकेवर ठाम राहणाऱ्या काँग्रेसमध्ये  स्वबळावर जाण्याचा सूर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये उमटत आहे. 

प्रदेशाध्यक्षांचा दुजोरा?
काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुकतीच मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी स्वबळाबाबत सूर उमटल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनीही दुजोरा दिल्याचे समजते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही काही दिवसांपासून हाच सूर आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये वाढत चालली नाराजी
काँग्रेसच्या एका नेत्याने याबाबत सांगितले की, "महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि 
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये वाढणारी नाराजी याचा थेट फटका पक्षसंघटनेला बसत आहे. स्वबळावर निवडणूक लढवून पक्षाची स्वतंत्र ओळख पुन्हा उभी करण्याचा विचार पक्षात सुरू आहे." काही महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर उमेदवार उभे केले होते. यातून पक्षाला संमिश्र यश मिळाले.  

Web Title : महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप? एमवीए टूटने की कगार पर; कांग्रेस अकेले चलने पर विचार!

Web Summary : विलय की चर्चा के बीच, कांग्रेस एमवीए से बाहर निकलने पर विचार कर रही है, समन्वय के मुद्दों और स्थानीय असंतोष के कारण अकेले चलने की संभावना तलाश रही है। आंतरिक चर्चा जारी है, नेता जल्द ही दिल्ली से परामर्श करेंगे।

Web Title : Maharashtra Political Earthquake? MVA on Brink; Congress Considers Going Solo.

Web Summary : Amidst merger talks, Congress considers exiting MVA, exploring solo path due to coordination issues and local dissatisfaction. Internal discussions are ongoing, with leaders consulting Delhi soon.