शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला अटक; तेलंगणातून पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:51 IST

Prashant Koratkar Arrested: इंतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे.

Prashant Koratkar Arrested: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसापासून फरार आहे. दोन दिवसापूर्वा प्रशांत कोरटकर देश सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनीतेलंगणा येथून कोरटकर याला ताब्यात घेतले आहे. 

Kunal Kamra: 'माफी तेव्हाच मागेन, जेव्हा...'; शिंदेंवरील विडंबन गाण्यावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया...

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

दरम्यान, या अटकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मिटकरी म्हणाले, तेलंगणामध्ये तो लपल्याची माहिती मिळाली होती. तब्बल एक महिना हा भामटा फिरत होता. इतक्या उशीरा अटक झाली. पण अटक झाली हे महत्वाच आहे. राहुल सोलापूरकर हा पण मोकाट राहता कामा नये. पोलिसांचे याबद्दल मी आभार मानतो. नागपूर पोलिसांच्या कारभारावर माझ पहिल्यापासून प्रश्नचिन्ह होते. तो नागपूरातून हैदराबादला फरार झाला, असंही मिटकरी म्हणाले.

फडणवीसांनी पोलीस त्याला पकडतील, असा विश्वास व्यक्त केला होता

फिर्यादी सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांची भेट घेऊन कोरटकरचा पासपोर्ट जमा करून घेण्यासाठी त्याच्या पत्नीला नोटीस पाठवण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर कोरटकर कुठेही गेला तरी पोलिस त्याला पकडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, त्याच्या पत्नीने तपासासाठी नागपुरात असलेल्या कोल्हापूर पोलिसांकडे कोरटकर याचा पासपोर्ट देऊन अफवा आणि चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, आज पोलिसांनी कारटकर याला तेलंगणा येथून अटक केली.  

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणा