शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मोठा दिलासा! कोरोना चाचणी आणखी स्वस्त झाली; जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 22:01 IST

आज सायंकाळी उशिराने या नव्या दराबाबतचे आदेश काढण्यात आले असून उद्या, 8 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

मुंबई : कोरोना चाचणीचे दर आणखी स्वस्त करण्यात आले असून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या दरांमध्ये 600 ते 800 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यापुढे कोरोना टेस्टसाठी कमीतकमी 1200 आणि अधिकाधिक 2000 रुपये मोजावे लागणार आहेत. 

कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1600 रुपये आकारले जाणार आहेत. यासाठी आधी 2200 रुपये आकारले जात होते. तर कलेक्शन साईटवर म्हमजेच कोव्हीड व्हॅन किंवा कॅम्प आदी ठिकाणी सॅम्पल दिल्यास यासाठी 1200 रुपये आकारले जाणार आहेत. यासाठी आधी 1900 रुपये आकारले जात होते. तर कोरोना सदृष्य रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेतल्यास 2000 रुपये आकारले जाणार आहेत.  आज सायंकाळी उशिराने या नव्या दराबाबतचे आदेश काढण्यात आले असून उद्या, 8 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. शासन निर्णयानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनएबीएल मान्यता प्राप्त खाजगी प्रयोगशाळांकडून कोवीड-१९ साठी असलेल्या आरटीपीसीआर तपासणीचे दर निश्चिती करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. यासमितीने तत्कालीन लॉकडाऊन परिस्थितीत मर्यादित साधन उपलब्धता लक्षात घेऊन, खाजगी प्रयोगशाळांशी चर्चा करून, खाजगी प्रयोगशाळानी आरटीपीसीआर तपासणीसाठी आकारावयाच्या दराबाबतचा अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार संदर्भ क्र.२ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीच्या कमाल दराबाबतचे दिनांक १३.०६.२०२० व ०४.०७.२०२० च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेले दर दिनांक ०७.०८.२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करून याच शासन निर्णयानुसार आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित कमाल दर निश्चित करण्यात आले होते. 

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक/औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. तसेच परिवहन व्यवस्थाही सुरू झाली आहे. तपासणीसाठी आवश्यक रिएजंट्स, व्हीटीएम किट्स व पीपीई किट्स, एन ९५ मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन किट GcM पोर्टल वर अत्यंत माफक दरात उपलब्ध झाले आहे. तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने, उपलब्धता वाढली आहे. परिणामी यांच्या किमती कमी झाल्या आहेत. राज्यात आयसीएमआर व एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन, आरटीपीसीआर चाचणीच्या दर कमी होणे आवश्यक होते. सदर बाब लक्षात घेऊन संदर्भ क्र. १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार गठित केलेल्या समितीने दरात सुधारणा करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. या समिती सादर केलेला अहवाल शासनाने स्विकृत केला आहे. त्यानुसार आरटीपीसीआर चावणीचे सुधारित दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या...

तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार

सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना

दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली

Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी

Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक